महाराष्ट्र

संघाच्या मुख्यालय परिसराची टेहळणी करणाऱ्या दहशतवाद्याला केली अटक

प्रतिनिधी

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. रईस शेख असे आरोपीचे नाव असून त्याने गेल्यावर्षी १५ जुलै २०२१ला नागपुरात घातपात करण्याच्या उद्देशाने टेहळणी केली असल्याचे समोर आले आहे.

जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्याने काश्मीर पोलिसांकडे नागपुरातील संघ मुख्यालयात टेहळणी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर नागपूर पोलीस दलाचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी काश्मीरला जाऊन रईसची चौकशी केली होती. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला व नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरला जाऊन त्याला ताब्यात घेतले. दहशतवादी रईस शेखची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याच्या सांगण्यावरून रईस शेख जुलैमध्ये नागपुरात आला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची त्याने पाहणी केली आणि तो काश्मिरला परतला. सप्टेंबर २०२१मध्ये रईसला काश्मिर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बुक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची टेहळणी केली होती. या ठिकाणांचे दुरूनच छायाचित्रण करून त्याने ते पाकिस्तानमधील म्होरक्याला पाठवले होते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश