उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हास्तरावर नियंत्रक; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रणनीती

पक्षाला लागलेली गळती भरून काढणे, राज्यात पक्ष बांधणी, जिल्हास्तरावर लोकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निवारण करणे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कंबर कसत आहे.

गिरीश चित्रे

पक्षाला लागलेली गळती भरून काढणे, राज्यात पक्ष बांधणी, जिल्हास्तरावर लोकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निवारण करणे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कंबर कसत आहे. या कामांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे जिल्हापातळीवर नियंत्रकाची नियुक्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत २८ नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष संघटना अधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कंबर कसत आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्हास्तरावर नियंत्रक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून शेकडो अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत २८ नियंत्रकाची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेमके चिन्ह कोणते. ठाकरेंच्या शिवसेनेचे चिन्ह मशाल असून राज्यातील प्रत्येक घरात मशाल पोहोचवण्याची जबाबदारी नियंत्रकाची असणार आहे.

नियंत्रकाचे असे असेल काम

जिल्हापातळीवर पक्ष बांधणी, मतदारांच्या अपेक्षा, विधानसभा मतदारसंघांत काय घडतंय आणि पक्षाचे चिन्ह प्रत्येक घरी पोहोचविणे, ही कामे नियंत्रकांची असणार आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत