महाराष्ट्र

चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी संपली,राज्यातील ११ मतदारसंघात सोमवारी मतदान

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. महाराष्ट्रातील ११ जागांसह ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

मावळ, पुणे, शिर्डीसह ११ मतदारसंघात २९८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील आदी मान्यवरांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील २.२८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान होणार असलेले ११ मतदारसंघ मध्य मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नंदुरबार, जळगाव, रावेर, मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आदी मतदारसंघात मतदान होणार आहे. १३ मे रोजी होणाऱ्या ४ थ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९६ मतदारसंघात मतदान होईल. यात १७१७ उमेदवार रिंगणात आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस