प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

१२ सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. १२ सप्टेंबर रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमापाठोपाठ सीईटी कक्षाने आयुर्वेद, होमियोपॅथी व युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थो आणि स्पीच ॲण्ड लँग्वेज पॅथोलॉजी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचेही वेळापत्रकही जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरावर उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील सीईटी कक्षाने संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबरपर्यंत रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पसंतीक्रम देता येईल. तर १२ सप्टेंबर रोजी चारही अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यादीत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ ते १८ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Mumbai : लोकल ट्रेन आता दर दोन मिनिटांनी! अपघात रोखण्यासाठी 'कवच ५.०' तंत्रज्ञान सज्ज

Mumbai : समुद्र किनारी स्वच्छता मोहीम; १० दिवसांत अडीच हजार टन कचऱ्याची विल्हेवाट

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

रक्त केंद्रांवर आरोग्य विभागाची नजर; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन जणांचे पथक, धडक तपासणी मोहीम राबवणार