( विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक छायाचित्र)
महाराष्ट्र

१० वीच्या निकालाआधीच विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी; आजपासून भरता येणार अर्जाचा पहिला भाग

दहावीच्या निकालाआधीच यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी शिक्षण विभागाने करून दिली आहे.

Swapnil S

मुंबई : दहावीच्या निकालाआधीच यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी शिक्षण विभागाने करून दिली आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांसाठी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात करण्यात येते. पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्याची संधी देण्यात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांना २४ मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. सरावासाठी संकेतस्थळावर दोन दिवस देण्यात आले होते. या कालावधीत सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी सरावाचे अर्ज भरले आहेत.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

- प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग १ भरणे - २४ मेपासून(एसएससी बोर्डाच्या) निकाल लागल्यानंतर दोन दिवस

- अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे - २४ मेपासून पुढे दहावी निकालानंतर दोन दिवसापर्यंत

- कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे (अर्ज भाग २) - दहावी निकालानंतर पाच दिवस (प्रत्येक फेरीपूर्वीही संधी)

- कोटा अंतर्गत प्रवेश - दहावी निकालानंतर पाच दिवस

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली