महाराष्ट्र

टेम्पोची ट्रकला पाठून धडक; १० भाविक ठार

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : चोटीला मातेच्या मंदिरातून दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला व ३ मुलांचा समावेश आहे. बावला-बगोदरा महामार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.

टायर पंक्चर झाल्याने ट्रक महामार्गावर उभा होता. या ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोने धडक दिली. या टेम्पोत ३ मुलांसह २० जण होते. चोटीला मातेच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे भाविक परतत होते. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली