महाराष्ट्र

महिलेच्या मृत्यू प्रकरणात अखेर डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

प्रसुतीनंतर त्यांना रक्तस्त्राव जास्त होत होता आणि तो थांबविण्यात डॉ. जवळगेकर आणि चव्हाण यांना अपयश आले

Swapnil S

नांदेड : १४ महिन्यांनी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणात अखेर लोहा येथील दोन डॉक्टरांवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी हनमंता रामकिशन शेट्टे (रा.लोहा) यांच्या पत्नी सुमन यांना लोहा येथील डॉ. संजय नागनाथराव जवळगेकर आणि डॉ. गणेश रुस्तुम चव्हाण यांच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर त्यांना रक्तस्त्राव जास्त होत होता आणि तो थांबविण्यात डॉ. जवळगेकर आणि चव्हाण यांना अपयश आले. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी महिलेला नांदेडकडे पाठविले आणि नांदेडला आणल्यानंतर तिचा मृत्यू अगोदरच झाला होता.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी