महाराष्ट्र

यंदा विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमांकडे कल, गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले प्रवेश

Swapnil S

मुंबई : राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून यंदा ७६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थ्यांचा कल कृषी अभ्यासक्रमांकडे वाढला असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी प्रवेश वाढले आहेत. १५ सप्टेंबरदरम्यान महाविद्यालय स्तरावर व व्यवस्थापन फेरीद्वारे प्रवेश होणार असल्याने प्रवेशांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविली जाते.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ४ जुलैपासून सुरुवात झाली आहे. सीईटी कक्षामार्फत १८ हजार १७७ जागांसाठी राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये १२ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. हे प्रमाण एकूण जागांच्या ७६ टक्के इतके आहे. तसेच रिक्त राहिलेल्या ३ हजार २८४ जागांवर १५ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालय स्तरावर व व्यवस्थापन फेरीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत.

अधिक चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी पहिल्या फेरीमध्ये ११ हजार २२५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिल्यानंतरही फक्त ३२९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये अनुक्रमे ३५२२ आणि ३८१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा