महाराष्ट्र

गुटखा तस्करीप्रकरणी दोघांना बोरिवलीतून अटक

तपासात त्यांनी हा गुटखा गुजरातच्या वापी शहरातून मुंबईत वितरण करण्यासाठी आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : गुटखा तस्करीप्रकरणी दोघांना बोरिवली परिसरातून एमएचबी पोलिसांनी अटक केली. राघवेंद्र शिवदुलारे आणि सौरभ गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी साडेआठ लाखांचा टेम्पोसह पावणेचार लाखांचा गुटखा असा सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासात त्यांनी हा गुटखा गुजरातच्या वापी शहरातून मुंबईत वितरण करण्यासाठी आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुरुवारी एमएचबी पोलिसांचे पथक बोरिवली परिसरात गस्त घालत होते.यावेळी पोलिसांनी एका टेम्पोला थांबविले. या टेम्पोची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना विमल पान मसाला आणि व्ही व्हन तंबाखूच्या दहा गोणी सापडले. त्याची किंमत पावणेचार लाख रुपये होती. या साठ्यासह टेम्पोनंतर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. याच गुन्ह्यांत नंतर पोलिसांनी राघवेंद्र रामदुलारे आणि सौरभ गुप्ता या दोघांना अटक केली.

‘जीआर’वरून रणकंदन! शासन निर्णय सरसकटचा नाही, खऱ्या कुणबींनाच आरक्षण मिळेल - मुख्यमंत्री

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण