महाराष्ट्र

अगरवालच्या अवैध बंगल्यावर हातोडा

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिला.

Swapnil S

कराड : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिला. अगरवालच्या महाबळेश्वर येथील बेकायदेशीर एमपीजी क्लबचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. उद्योगपती विशाल अगरवाल याचे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सील केले होते. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सकाळीच साडेदहापर्यंत प्रशासनाने हॉटेलच्या अवैध १५ खोल्यांचे बांधकाम पाडून तोडकामाची कारवाई पूर्ण केली.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते कारवाईचे आदेश

बिल्डर अगरवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या तपासणीत हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.

भाडेपट्ट्यावरील जागेचा वाणिज्यिक वापर

लीजवरील एमपीजी क्लबच्या जागेचा वाणिज्यिक कारणासाठी वापर होत असल्याचे आढळल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या क्लबला काही दिवसांपूर्वी प्रशासनाने टाळे ठोकले होते.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी