प्रातिनिधिक 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
महाराष्ट्र

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान

मंत्रालयासारख्या सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही असले तरी मंत्र्यांच्या निवासस्थानी गोपनीयता राखण्यासाठी आतापर्यंत असे कॅमेरे टाळले जात होते. सुरुवातीला हे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे होते, परंतु मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ते...

रविकिरण देशमुख

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या बंगल्यावर आता ३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यासाठी १.२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गृह विभागाने हा प्रकल्प राबवला असून, सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेले 'वर्षा' हे राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान ठरले आहे.

मंत्रालयासारख्या सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही असले तरी मंत्र्यांच्या निवासस्थानी गोपनीयता राखण्यासाठी आतापर्यंत असे कॅमेरे टाळले जात होते. सुरुवातीला हे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे होते, परंतु मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ते गृह विभागाकडे सोपवण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामार्फत ही यंत्रणा बसवण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद शासनाने केली आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे इतर मंत्र्यांच्या निवासस्थानीही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाण्याची शक्यता आहे. 'वर्षा' हा मलबार हिलवरील महत्त्वाचा बंगला असून तिथे येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मोठी असते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात

महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली

पक्षांतर करणाऱ्यांना चिन्ह देता येईल का? शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

बसमध्ये कोंबले, नाशिकला धाडले; काँग्रेस कार्यालयात आदिवासी विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट, ‘टिळक भवन’ला आखाड्याचे स्वरूप

आशुतोष दीक्षित बनले नवे हवाई दल प्रमुख