महाराष्ट्र

वसंत मोरे यांची शरद पवार गटावर टीका

वसंत मोरे आणि 'वंचित' हे काही गणितच मला कळत नाही, वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, यांची कलाकारी मला नाही समजली, मी पण कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात, 'मुरली'ची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना? असा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केला होता.

Swapnil S

पुणे: मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला. आव्हाड रवींद्र धंगेकरचा प्रचार करायला आले होते. त्यांचं डिमोशन करुन गेले का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वसंत मोरे आणि 'वंचित' हे काही गणितच मला कळत नाही, वसंत मोरे हे काय कलाकार आहेत, यांची कलाकारी मला नाही समजली, मी पण कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात, 'मुरली'ची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना? असा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केला होता. त्यावर वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाड यांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी टोला लगावला आहे.

मोरे म्हणाले, वसंत मोरेंना लोक चेहऱ्याने ओळखत नाही तर वसंत मोरेंचे विकास कामं प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. त्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून मला उमेदवारी दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे कलाकार आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे. आव्हाड नेमके कसे कलाकार आहेत, हे सगळ्या राज्याला माहित आहे. निष्ठावान होतो आणि आहे. वसंत मोरे म्हणाले की, माझा प्रचार जोरात सुरू आहे आणि प्रतिसाद चांगला मिळत आहे. मी आज नाही तर गेली चार वर्षे सातत्याने कोरोना कालावधीनंतर शहरांमध्ये काम करतो आहे. चार वर्षांमध्ये विकासासाठी भरपूर काम केले.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता