वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट; बनावट नंबरप्लेट व त्यातील छेडछाडीला आळा Free Pic
महाराष्ट्र

वाहनांवर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट; बनावट नंबरप्लेट व त्यातील छेडछाडीला आळा

मुंबई : बनावट नंबरप्लेट, त्यामध्ये केलेली छेडछाड, नंबरप्लेट बदलून गुन्ह्यांसाठी गाडीचा वापर करणे आता भारी पडणार आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनांचा गैरवापर करून होणाऱ्या गुन्ह्यांना जेरबंद करणे शक्य होणार आहे.

Swapnil S

मुंबई : बनावट नंबरप्लेट, त्यामध्ये केलेली छेडछाड, नंबरप्लेट बदलून गुन्ह्यांसाठी गाडीचा वापर करणे आता भारी पडणार आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनांचा गैरवापर करून होणाऱ्या गुन्ह्यांना जेरबंद करणे शक्य होणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावट बदल करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट न बसवल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे, चढविणे, दुय्यम आरसी, विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

हाय सिक्युरीटी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

या वेबसाइटवर बुकिंग करा!

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबरप्लेट बसविण्याकरिता बुकिंग पोर्टल https:// hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून अपॉइंटमेंट घ्यावी आणि नंबरप्लेट बसवून घेण्यात यावी.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश