महाराष्ट्र

ज्येष्ठ कवी अरुण काकतकर यांचे निधन

दूरदर्शनचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ, कल्पक व प्रतिभावान निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. काकतकर यांनी दूरदर्शनवर 'शब्दांच्या पलीकडले' सारख्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती व दिग्दर्शन केले.

Swapnil S

पुणे : दूरदर्शनचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ, कल्पक व प्रतिभावान निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. काकतकर यांनी दूरदर्शनवर 'शब्दांच्या पलीकडले' सारख्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यांच्या कामातून मराठी संगीत आणि काव्यविश्वाला नवी दिशा मिळाली. त्यांनी शेकडो मराठी तरुण गायक-गायिकांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

तसेच मंगेशकर कुटुंबीयांसह अनेक नामवंत कवी आणि संगीतकारांना दूरदर्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणत त्यांनी भावपूर्ण गीतांचे सादरीकरण घडवून आणले. दूरदर्शनवरील 'पडघवली' सारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केले होते. याशिवाय अनेक गाजलेल्या जाहिरातपटांचे दिग्दर्शन आणि काव्यरचना त्यांच्या नावावर आहेत.

शब्द, सूर, सादरीकरण आणि दिग्दर्शन यांचा सुंदर संगम त्यांच्या कामात दिसून येत असे. कॅमेरा आणि माध्यमांची सखोल जाण असल्याने त्यांनी प्रत्येक निर्मितीत वेगळेपणा जपला. 'आनंदघन' आणि 'मंतरलेल्या रंगमंचीय चैत्रबनात' सारख्या कार्यक्रमांचे त्यांनी दिग्दर्शन करून हजारो प्रयोग सादर केले.

पुण्यातील बालचित्रवाणीचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात हजारो शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य, संगीत आणि दूरदर्शन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नक्षत्रांचे दिवस', 'ठोसबोध', 'ठसे आणि ठोसे', 'आशयसूत्रे ओविले शब्द', अशी त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. काकतकर यांनी दुरदर्शन, बालचित्रवाणी आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांची मनमुराद सेवा केली आणि लोकरंजन केले.

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम

Mumbai : पार्त्यात उड्डाणपुलाखाली पहिलाच शहरी शेती प्रकल्प; फळभाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग भरणार

धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश

Mumbai : वारसाहक्क वादावर निर्णय घेण्याचा गृहनिर्माण संस्थांना अधिकार नाही! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ