पुणे : ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणात धक्कादायक खुलासे करत रोहिणी खडसे आणि वकील विजय ठोंबरे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. पोलीस कोठडीत असलेल्या डॉ. खेवलकर यांचा आयफोन ताब्यात असताना, त्यांचा गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावमधील एका आमदाराकडे कसा गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा सर्व प्रकार डॉ. खेवलकर यांना जाणूनबुजून अडकवण्यासाठी रचलेला 'बनावट डाव' असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. तसेच पुणे पोलिसांविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.
यासंदर्भात खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे आणि रोहिणी खडसे यांनी आयुक्तांची भेट घेउन एक तक्रार अर्ज दाखल केला. त्यामध्ये डॉ. खेवलकर यांचे वैयक्तिक फोटो आणि रेडचे व्हिडिओ कोणी व्हायरल केले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. छाप्याच्या ठिकाणी फक्त पोलीस असताना हे व्हिडीओ कसे लीक झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, माध्यमांमध्ये डॉ. खेवलकर यांना 'सराईत गुन्हेगार' म्हणून दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, असे वकिलांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात, त्यांच्याविरुद्ध साधी शिवीगाळ केल्याची एनसी सुद्धा नाही आणि त्यांनी कधी पोलीस स्टेशनचे तोंडही पाहिले नाही. पोलिसांनी ही 'टायपोग्राफिकल मिस्टेक' असल्याचे मान्य केले असल्याचे ॲड. विजय ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. माध्यमांमध्ये डॉ. खेवलकर यांना 'सराईत गुन्हेगार' म्हणून दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध साधी शिवीगाळ केल्याची साधी नोंद (NC) सुद्धा नाही आणि त्यांनी कधी पोलीस स्टेशनचे तोंडही पाहिले नाही.
पोलिसांनी ही 'टायपोग्राफिकल मिस्टेक' असल्याचे मान्य केले असल्याचे एड. विजय ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस आयुक्तांनी यापुढे कुठलेही फोटो व्हायरल होणार नाहीत आणि जे काही झाले त्याची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. नारकोटिक्सचे रक्ताचे नमुने लवकरात लवकर न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यायालयीन लढा आणि ५० कोटींचा दावा
डॉ. खेवलकर यांना जामीन मिळवून देणे हे वकिलांचे पहिले उद्दिष्ट आहे. जर दोन दिवसांत जामीन मिळाला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वकील ठोंबरे यांनी नमूद केले आहे. पुणे पोलिसांच्या पहिल्या रिमांड रिपोर्टमध्ये खोटी माहिती दिल्याने आणि पूर्णपणे अडकवण्यासाठी बनावट प्रकार करण्यात आल्याने, पुणे पोलिसांविरोधात पन्नास कोटी रुपयांचा दावा ठोकण्याची तयारी खेवलकर यांच्या वकिलांनी दर्शवली आहे . डॉ. खेवलकर बाहेर आल्यानंतर या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर निश्चितच कायदेशीर कारवाई करतील, असे संकेतही देण्यात आले आहेत.
'माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू'
माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा आणि अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावास जोडले गेलेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणात खडसे यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला असून, महिलांच्या न्यायालयीन कोठडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खडसे म्हणाले, “ज्या महिलेच्या पर्समध्ये गांजा सदृश पदार्थ आढळला, तिची नीट चौकशी न करता इतर लोकांची चौकशी केली जात आहे. यामागे काही तरी 'प्लांट' करण्याचा प्रकार असावा असे वाटते. काल न्यायालयाने पाच जणांना पोलीस कोठडी तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, पोलिसांनीच महिलांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. जेव्हा पदार्थ सापडतो, तेव्हा पोलीस स्वतःच न्यायालयीन कोठडी का मागतात? हे आश्चर्यकारक आहे, असे खडसे म्हणाले. खडसेंनी पुढे म्हणाले, प्रांजल खेवलकरने ना काही ड्रग घेतले, ना बाळगले, ना कुणाला मदत केली असे स्पष्ट चित्र आहे. मात्र तरीही त्याला अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचा हेतू निव्वळ आमच्या कुटुंबाला बदनाम करणे आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोप करत खडसे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.