महाराष्ट्र

"भाजपने जो महाराष्ट्र पेटवलाय तो आम्हाला नको", नेमकं काय म्हणले नाना पटोले?

नवशक्ती Web Desk

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन जो तणाव निर्माण झाला आहे. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार सडकून टीका केली आहे. सरकारकडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सुरु आहे. सरकारने आरक्षणाबाबत जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, आम्हाला सामाजिक न्यायाचा महाराष्टर हवा आहे. मात्र, भाजपने जो महाराष्ट्र पेटवला आहे. तो आम्हाला नकोय. त्यामुळे या सगळ्या विषयात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करायला हवा. फक्त छगन भुजबळच नाही तर संपूर्ण सरकार या वादात सहभागी आहे. असं नाना पटोले म्हणाले.

राज्यात दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ जाहीर केला जात नाही. फक्त मंत्र्यांचे तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले जात आहेत. अशा पद्धतीने राज्य चालू शकत नाही. १ सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु झाले आहेत. त्यावरुन पाऊस किती कमी पडलाय, याचा अंदाज येतो. मात्र याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी जाणूनबुजून वेगळा वाद निर्माण केला जात आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला.

सरकारला धारेवर धरताना नाना पटोले म्हणाले की, सरकार महागाईवर बोलायला तयार नाही. नोकरभरतीबाबतही संभ्रम आहे. परंतु माध्यमांचं सगळं लक्ष मराठा आणि ओबीसी वादाकडे वळवायचं आणि सरकारने फक्त गंमत पहावी, असा राज्य सरकर्त्यांचा प्रयत्न आहे. आमचा सरकारच्या या भूमिकेला विरोध आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मनोज पाटलांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला होता आणि म्हणूनच फडणवीसांनी माफी देखील मागितली होती. असं नाना म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त