महाराष्ट्र

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीची पार्श्वभूमी आणि प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Mayuri Gawade

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीटीआय आणि स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीला गोठ्याकडे नेताना दिसला होता. त्यानंतर तपासादरम्यान त्याची ओळख पटली.

भीमराव कांबळे कोण आहे?

आरोपी भीमराव कांबळे हा ६५ वर्षीय मजूर असून तो गावातच राहत असल्याचे समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल झाले होते.

१९९८ आणि २०१५ मध्ये त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र, दोन्ही प्रकरणांत तो निर्दोष सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो गावात फिरत राहायचा आणि अधूनमधून मजुरीचे काम करत असल्याचेही सांगण्यात आले.

घटना नेमकी कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीच्या घरी आली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने तिला गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली.

मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला

गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवल्याचा आरोप आहे. दुपारच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसल्यामुळे पोलिसांनी त्याची ओळख पटवली.

पुणे–बेंगळुरू महामार्गावर आंदोलन

या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. निषेधार्थ आंदोलकांनी पुणे–बेंगळुरू महामार्ग रोखला. काही ठिकाणी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार

चिमुरडीचा मृतदेह कडेकोट पोलिस बंदोबस्तात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आला. तेथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन