Manoj Jarange vs Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

आरक्षणासाठी फडणवीस यांच्याशी भांडण करेन, २९ ऑगस्टला मोठा निर्णय घेण्याचा मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षणासाठी पुण्यात रविवारी जनजागृती आणि शांतता रॅलीला सहा तासांच्या विलंबाने सुरुवात झाली. यावेळीही मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.

Swapnil S

पुणे : मराठा आरक्षणासाठी पुण्यात रविवारी जनजागृती आणि शांतता रॅलीला सहा तासांच्या विलंबाने सुरुवात झाली. यावेळीही मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. फडणवीस आरक्षणाचे आश्वासन देतात, मात्र आरक्षण देत नाहीत. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात असलेल्यांची नावे सांगा. आता आरक्षण दिले नाही तर आम्हाला फडणवीस यांच्याशी भांडण करावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

पुण्यातील रॅलीदरम्यान ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून जरांगे यांचे बॅनर झळकत होते. या सभेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.

“देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे छगन भुजबळ आणि इतर नेते माझ्याविरोधात आणि मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत. जे कोण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. काही झाले तरी फडणवीस यांना समाजाला उत्तर तर द्यावेच लागेल. त्यामुळे फडणवीस यांना एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या अंगावर येऊ नये. मराठा समाज त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सरळ आरक्षण देणार नसाल तर तुमच्याशी भांडणच करावे लागेल. सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे.

WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आता मेसेज शेड्युल करता येणार; 'व्ह्यू वन्स' टेक्स्टचाही पर्याय, जाणून घ्या नवे फीचर्स

Pune : शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एकावर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सपासप वार करून हल्लेखोर फरार

पाणी कपातीतून आठवड्याचा दिलासा! एमआयडीसीचा २७ नोव्हेंबरचे नियोजित शटडाऊन रद्द

Naigaon : आईच्या निधनाचं दुःख ताजं असतानाच आणखी एक आघात; खेळताना ११ व्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! लेकीच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू; भावांनी केली बहिणीची पाठवणी