महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार? भाऊसाहेब वाकचौरेंनंतर 'हा' बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे बडे बबनराव पाचपते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

नवशक्ती Web Desk

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेला मोठ भगदाड पाडलं. यानंतर त्यांनी शिवसेनेवरच आपला दावा सांगत पक्षावर ताबा मिळवला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली. आजी माजी आमदार, खासदार, नेते, पादाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. उद्धव ठाकरे यांना रोज नवनवी धक्के बसत गेले. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्षाची बांधणी करायला सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर मधील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आात अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे बडे बबनराव पाचपते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज(४ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता साजन पाचपुते मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबती माहिती दिली आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, "अहमदनगर जिल्ह्यातील राजकाणातील आणखी एक पॉवरफुल पुतण्या आज शिवसेनेत! सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर साजन पातपुते वाजत-गाजत शिवसेनेत प्रवेश करणार.." अशी माहिती राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा