महाराष्ट्र

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांची गाव-पाड्यांना भेट

वृत्तसंस्था

मुरबाड तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासींचे वास्तव्य असलेल्या गाव-पाड्यांमध्ये पोचून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मंगळवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात संपर्कासाठी नवे रस्ते व जुन्या रस्त्यांची दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडून दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात दुर्गम भागातील गावांमधील परिस्थिती पाहून समस्या सोडविण्यासाठी दौरा केला जातो. मात्र, कोरोना संसर्गामुळे दौरा झाला नव्हता. यंदा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आवर्जून मोधळवाडी, बांडेशित, मेर्दी, धारखिंड, आल्याचीवाडी, आंबवाडी, लोत्याची वाडी येथील पाड्यांना भेट दिली. प्रत्यक्षात पाड्यांमध्ये पोचून आदिवासींबरोबर संवाद साधला. या वेळी भगवान भला , संजय पवार, प्रकाश पवार, अशोक पठारे, सुधाकर पठारे, संतोष देशमुख उपस्थित होते. आल्याची वाडी येथील माजी सरपंच दामोदर भला यांनी भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती दिली. या गावांमधील ग्रामस्थ पांडुरंग दरोडा, राजू कवटे, नामदेव भला, गोविंद भला, तुकाराम पोकळा, दशरथ भला, भिवा भला, रघुनाथ पठारे, राम पठारे, दिलीप पठारे, दत्तात्रेय पठारे आदींनी उपाध्यक्ष सुभाष पवार यांना विविध समस्या सांगितल्या. विकास कामांचे आश्वासन 

गावात पोचण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवे रस्ते व सध्याच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. या भागातील शाळेची दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर