मुंबई

फ्लॅटसाठी ११ लाखांची फसवणूक

एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठगाविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : कांदिवली आणि बोरिवलीतील फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ११ लाखांचा अपहार करून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठगाविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. संदीप अरविंद भाटे आणि दिलीप मुरुडकर अशी या दोघांची नावे असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. बोरिवलीत शिवणकाम करणाऱ्या एका महिलेला दिलीपने स्वस्तात फ्लॅट मिळवून देतो, असे आश्‍वासन दिले होते. त्याचा मित्र संदीपच्या मदतीने दोन फ्लॅट दाखवून तिच्याकडून या दोघांनी ११ लाख रुपये घेतले होते. मात्र फ्लॅटचा ताबा न देताच ते टाळाटाळ करत होते. अखेर तिने संदीप भाटे आणि दिलीप मुरुडकर या दोघांविरुद्ध दहिसर पोलिसात तक्रार केली होती.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री