Byculla zoo ANI
मुंबई

Covid 19 : प्राणीसंग्रहालयात विक्रमी गर्दी, बीएमसीसाठी धोक्याची घंटा

आम्ही आलेल्या लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क घालण्याचे आवाहन केले. परंतु क्वचितच कोणी ऐकले, त्यापैकी बहुतेकांनी त्यांच्यासोबत मास्क आणले नव्हते. मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने...

विक्रांत नलावडे

मुंबई: भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Veermata Jijabai Bhosale Udyan) प्राणिसंग्रहालयातील विक्रमी गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 (Covid 19) प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीएमसीसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे. प्राणीसंग्रहालयात रविवारी एकूण 29,677 पर्यटक आले. परंतु सर्वात चिंतेची गोष्ट अशी होती की, त्यापैकी बहुतेक लोक मास्क परिधान न केलेले होते, ज्यामुळे संसर्गाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राणीसंग्रहालयाची सुरक्षा असहाय्य दिसत असताना, ते फक्त लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करू शकत होते.

मुंबईतील या प्रसिद्ध असलेल्या प्राणीसंग्रहालयात आठवड्याच्या दिवसात सरासरी 4,000-5,000 लोकांची संख्या असते, तर आठवड्याच्या शेवटी 15,000-18,000 पर्यंत वाढते. प्राणीसंग्रहालयात काही विदेशी प्राण्यांची नवीन भर हे सर्वात मोठे आकर्षण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवड्याच्या दिवसात सरासरी 12000 पर्यंत पोहोचते, तर आठवड्याच्या शेवटी ते 26,000-28,000 पर्यंत जाते.

गेल्या रविवारी ३०,३७९ लोकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली, जी आतापर्यतच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. तथापि, या रविवारी संख्येत (29,677) किंचित घट झाली.

"आम्ही आलेल्या लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क घालण्याचे आवाहन केले. परंतु क्वचितच कोणी ऐकले, त्यापैकी बहुतेकांनी त्यांच्यासोबत मास्क आणले नव्हते. मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने आम्ही जास्त काही करू शकत नव्हतो, असे प्राणीसंग्रहालयातील सूत्रांनी सांगितले.

यापूर्वीच्या तीन कोविड-19 लाटांमध्ये भायखळा प्राणीसंग्रहालय दोनदा बंद करण्यात आले होते. तिसऱ्या लाटेत प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, प्राणीसंग्रहालय फेब्रुवारीमध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले. गेल्या एका महिन्यात, प्राणीसंग्रहालयाने 3,68,729 पर्यटकांची नोंद केली आहे आणि १,४२,६८, ५८०. रु.चा महसूल गोळा केला आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी म्हणाले, "आम्ही पर्यटकांना मास्क घालण्याची विनंती करणारी घोषणा करतो. तसेच, आठवड्याच्या शेवटी आम्ही सुरक्षा वाढवतो."

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी