मुंबई

राज्यात २८ मेला साजरा होणार 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्रामध्ये २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये आता २८ मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही घोषणा केली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत." अशी माहिती त्यांनी दिली आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती