मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव ते कुसगांवदरम्यान पुणे वाहिनीवर पुलाचे गर्डर बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव ते कुसगांवदरम्यान पुणे वाहिनीवर पुलाचे गर्डर बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २७ ते २९ जानेवारी या कालावधीत दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

डोंगरगाव ते कुसगांवदरम्यान पुणे वाहिनी येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २२ जानेवारीपासून हाती घेतले आहे. या कामासाठी २२ ते २४ जानेवारीदरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत गर्डर बसविण्याचे काम करण्यात आले. उर्वरित कामासाठी २७ ते २९ जानेवारी या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत दुसऱ्यांदा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकच्या तिन्ही दिवस दुपारी ३ वाजेनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सुरू करण्यात येईल. त्यानुसार द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनी नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. तसेच ब्लॉक कालावधीदरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

वाहतूक देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवणार

ब्लॉक कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरून सुरू राहणार आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश