मुंबई : स्वस्तात रूम देण्याचे आमीष दाखवून दोन व्यक्तींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मालाड आणि बांगूरनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. राजाराम लालधर जाधव, रामचंद्र नाडर आणि आयकोड राजा नाडर अशी या तिघांची नावे असून या तिघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मालाडमध्ये राहणाऱ्या तक्रारदारांला या दोघांनी एका एसआरए इमारतीमध्ये रूम देण्याचे आमिष दाखवून रामचंद्र आणि आयकोड यांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत रूम न दिल्यामुळे त्यांनी मालाड पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. दुसऱ्या घटनेत एका इलेक्ट्रिशियनची रामचंद्रने साडेनऊ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.