मुंबई

अबब... विक्रोळीत ५ कोटींची भिंत; नाल्याशेजारी १७५ मीटर लांब आरसीसी बांधकाम

दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : नाल्याशेजारी राहणाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर तर विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कमी दरात काम करणाऱ्या कंत्राटदारांवर मेहरबान, सौंदर्यीकरणावर ७०० कोटींचा खर्च करणारी मुंबई महापालिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल ४ कोटी ८२ लाख ३५ हजार ८७५ रुपये खर्चणार असल्याने कंत्राटदारावर पालिका मेहरबान अशी टीका विरोधकांनी केली आहे. मुबलक पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा या करदात्या मुंबईकरांच्या माफक अपेक्षा. मात्र कंत्राटदारांवर मेहरबान असलेली मुंबई महापालिका संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर व विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १७५ मीटर लांब व ९ मीटर रूंद नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव