मुंबई

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतलेल्या ८१ लाखांचा अपहार

कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बोरिवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Swapnil S

मुंबई : एमडी कोर्ससाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतलेल्या सुमारे ८१ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांच्या एका टोळीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अनिल रामचंद्र तांबट, संदीप वाघमारे, अभिजीत पाटील आणि भूषण पाटील अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली येथे राहणाऱ्या मंगेश अनंत राणे यांचा मुलगा आदित्यला एमबीबीएसनंतर एमडी कोर्ससाठी प्रवेश हवा होता. याचदरम्यान त्यांची अनिल तांबटसह इतर आरोपींशी ओळख झाली होती. या चौघांनी त्यांच्या मुलाला पुण्याच्या बी. जे वैद्यकीय महाविद्यालयात एनआरआर किंवा शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी एमडी कोर्स प्रवेशासाठी अनिल तांबडला ९४ लाख, अभिजीत पाटीलला साडेआठ लाख, संदीप वाघमारेला २३ लाख तर भूषण पाटीलला ११ लाख असे १ कोटी ३६ लाख रुपये दिले होते. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बोरिवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन