PM
मुंबई

८ महिन्यात ८५८ मुलांची सुटका ;'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाची कौतुकास्पद कामगिरी

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मुलांची सुटका केल्याने त्यांचे पालक व मध्य रेल्वेकडून कौतुक केले.

Swapnil S

मुंबई : कौटुंबिक वाद, माया नगरी मुंबईचे आकर्षण अशा विविध कारणांमुळे घरी न सांगता बाहेर पडलेल्या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ८५८ लहान मुलांची सुटका केली असून यात २६७ मुलींची ही सुटका केली आहे.  तर याच कालावधीत मुंबईतील २५२ मुलांची सुटका करण्यात आली. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'  अंतर्गत मुलांची सुटका केल्याने त्यांचे पालक व मध्य रेल्वेकडून कौतुक केले.

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील मालमत्ता, प्रवाशांची सुरक्षा करण्यास रेल्वे स्थानकात सापडणाऱ्या लहान मुलांना गैरप्रकारापासून रोखणे अशी जबरदस्त कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नेहमीच बजावतात. मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण बलाने (आरपीएफ) शासकीय लोहमार्ग पोलीसांच्या समन्वयात ८५८ मुलांची सुटका केली आहे.  मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानक परिसर व प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस आणि इतर अग्रभागी रेल्वे कर्मचारी यांनी एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत ५९१ मुले आणि २६७ मुलींचा समावेश असलेल्या आणि 'चाइल्डलाइन' सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.

भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात आणि त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा भेटण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली.

 विभागनिहाय कामगिरी!

* मुंबई विभागाने सर्वाधिक २५२ मुलांची सुटका केली असून त्यात १५७ मुले आणि ९५ मुलींचा समावेश आहे.

* भुसावळ विभागाने २३८ मुलांची सुटका केली असून यामध्ये १४८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे.

* पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे.

नागपूर विभागाने १११ मुलांची सुटका केली असून यामध्ये ५८ मुले आणि ५३ मुलींचा समावेश आहे.

* सोलापूर विभागाने ३० मुले आणि २१ मुलींचा समावेश असलेल्या ५१ मुलांची सुटका केली.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन