PM
मुंबई

मुंबई : सिगारेट पिण्यावरून वाद, मित्रांनी चाकूने केले वार; एकाचा मृत्यू

जखमी झालेल्या शफीला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

मुंबई : सिगारेट पिण्याच्या वादातून फ्रॉन्सिस ऊर्फ शफी फर्नांडिस या ५१ वर्षांच्या व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी सैद इक्बाल शेख या मारेकऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याचे इतर सहकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही घटना बुधवारी रात्री ११.४५ वाजता वांद्रे येथील चॅपेल रोड, टोनी स्टोअरजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शफी हा वांद्रे येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. बुधवारी रात्री सिगारेट पिण्यावरून त्याचा सैदसोबत वाद झाला होता. या वादानंतर सैदसह त्याच्या मित्रांनी त्याच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या शफीला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी शफीची पत्नी झियान फर्नांडिस हिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला होता.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई