मुंबई

शेवाळेंविरोधात खोटे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, असे शेवाळे म्हणाले.

प्रतिनिधी

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महिलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, असे शेवाळे म्हणाले.

खासदार शेवाळे यांनी १२ मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे, या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश