मुंबई

अडीच कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फ्लॅटसाठी पैसे घेऊन ताबा न देता फसवणुक केल्याचा आरोप

प्रतिनिधी

मुंबई: सुमारे अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ऋषय ऑशम रॉय, ऑशम रॉय आणि राजेश डहाणूकर अशी या तिघांची नावे असून या तिघांवर फ्लॅटसाठी पैसे घेऊन फ्लॅटचा ताबा न देता फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सागितले. नवी मुंबईत राहणार्‍या तक्रारदाराचा इंटेरियर डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांचे नवी मुंबईत स्वतचा फ्लॅट आणि कार्यालय आहे. त्यांना मुंबईत गुंतवणुक म्हणून एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी काही एजंटशी संपर्क साधला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत त्यांना एका एजंटच्या मदतीने अंधेरीतील एमआयडीसी, स्टर्लिंग कोर्ट सोसायटीच्या दहाव्या मजल्यावर एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे समजले होते. यावेळी एजंट म्हणून काम करणार्‍या राजेशने त्यांची फ्लॅटचे मालक असलेले रॉय पिता-पूत्रांशी ओळख करुन दिली होती. ९६८ चौ फुटाच्या या फ्लॅटची किंमत २ कोटी ५५ लाख रुपये होती. या फ्लॅटवर रॉय कुटुंबियांनी कर्ज घेतले असून कर्जाची परतफेड करता येत नसल्याने ते फ्लॅटची विक्री करत आहे असेही राजेशने त्यांच्या मिटींगमध्ये त्यांना सांगितले होते. कर्जाची रक्कम भरुन उर्वरित रक्कम रॉय कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांना फ्लॅटचा ताबा मिळणार होता. त्यास त्यांनी होकार देत एका अर्थपुरवठा करणार्‍या कंपनीत गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांचे सिव्हिल रेकॉर्ड चांगले असल्याने त्यांना कंपनीने दोन कोटी दहा लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले होते. त्यापैकी रॉय यांचे ८६ लाख रुपयांचे गृहकर्ज त्यांनी फेडले तर उर्वरित रक्कम रॉय कुटुंबियांना दिली होती. अशा प्रकारे त्यांनी त्यांना फ्लॅटसाठी २ कोटी ५५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात अंधेरीतील सहदुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅटचे स्टॅम्प ड्यूटीसह रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. यावेळी ऋषभ आणि ऑशम यांनी त्यांना नोव्हेबर २०२२ रोजी फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते. मात्र दोन ते तीन उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यांनतर या पिता-पूत्रांनी त्यांना फ्लॅटचा ताबा देणार नाही, तुम्ही दिलेली रक्कम परत करणार नाही आणि पुन्हा सोसायटीमध्ये आलात तर वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली होती. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शना येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ऋषय ऑशम रॉय, ऑशम रॉय आणि राजेश डहाणूकर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली