मुंबई

चालताना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या

चालताना धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून सुहेब ऊर्फ शोएब सुहेबुद्दीन ईमामुद्दीन अन्सारी या २२ वर्षांच्या तरुणाची तीन जणांच्या टोळीने हाताने आणि पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना रविवारी साकीनाका परिसरात उघडकीस आली.

Swapnil S

मुंबई : चालताना धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून सुहेब ऊर्फ शोएब सुहेबुद्दीन ईमामुद्दीन अन्सारी या २२ वर्षांच्या तरुणाची तीन जणांच्या टोळीने हाताने आणि पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना रविवारी साकीनाका परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या तिन्ही मारेकऱ्यांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. अनस इकरार अहमद शेख, गुल्फराज बिस्मिल्ला खान आणि अफजल सगीर अहमद सय्यद अशी या तिघांची नावे असून ते तिघेही साकिनाका परिसरातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सद्दाम हुसैन ईमामुद्दीन अन्सारी हा तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी असून, सध्या साकीनाका येथील खैराणी रोड, कोल्हापूर इस्टेट परिसरात राहतो. तो कपड्यावरील जरीकाम करत असून, मृत सुहेब हा त्याचा लहान भाऊ आहे. रविवारी दुपारी तो जेवण आणण्यासाठी घरी आला होता. एम. जे. स्टुडिओ समोरून जात असताना बाइकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या आरोपींचा त्याला धक्का लागला होता. याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात या आरोपींनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. हाताने आणि पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याने सुहेब हा गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या सुहेबला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या पॅरामाऊंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

राज्यातील हजारो करदात्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

"सर्वांना माफ कर..." ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हरिश राणाच्या इच्छामरणाचा प्रवास सुरु; भावनिक निरोपाचा VIDEO व्हायरल

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"

PNG वाले सरकारसाठी सावत्र! पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांना LPG जोडणी ठेवण्यास सरकारची मनाई