@dharmveerananddighesaheb/FB
मुंबई

आनंद दिघे कल्याणकारी मंडळास ‘आधार’; राज्य सरकारकडून ५० कोटींचा निधी मंजूर, शासन अध्यादेश जारी

आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण होता यावे, यासाठी राज्य सरकारने मंडळास ५० कोटींचा निधी प्रथमच मंजूर केला आहे.

Swapnil S

मुंबई : आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण होता यावे, यासाठी राज्य सरकारने मंडळास ५० कोटींचा निधी प्रथमच मंजूर केला आहे. याबाबत मंगळवारी शासन अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाकडून ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एक वेळचे अनुदान रुपये ५० कोटी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार  २०२४-२५ या आर्थिक वर्षांत मंजूर अनुदानातून धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळासाठी ५० कोटी निधी  देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

हा निधी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी, परिवहन आयुक्त यांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी