Mumbai : ‘एबीसी-अपार’ आयडी परीक्षांसाठी अनिवार्य; ११ हजार विद्यार्थ्यांची लिंकिंग प्रक्रिया अद्याप अपूर्ण  
मुंबई

Mumbai : ‘एबीसी-अपार’ आयडी परीक्षांसाठी अनिवार्य; ११ हजार विद्यार्थ्यांची लिंकिंग प्रक्रिया अद्याप अपूर्ण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल स्वरूपात संकलन, संचयन, हस्तांतरण आणि पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एबीसी आयडी/अपार आयडी अनिवार्य केले आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल स्वरूपात संकलन, संचयन, हस्तांतरण आणि पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एबीसी आयडी/अपार आयडी अनिवार्य केले आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपला वैध एबीसी आयडी/अपार आयडी नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यानी परीक्षा अर्जात नमूद केलेला आयडी त्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर दर्शविण्यात येणार आहे. असे असूनही अद्याप ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप आपला एबीसी आयडी/अपार आयडी विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालये व संस्थांना देण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे वैध एबीसी आयडी/अपार आयडी उपलब्ध नाही किंवा ज्यांनी तो विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडलेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र विद्यापीठामार्फत निर्गमित केले जाणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने यापूर्वी विविध परिपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना एबीसी आयडी/अपार आयडी तयार करून विद्यापीठाच्या पोर्टलशी जोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अनुषंगाने विशेष शिबिराचे आयोजनही विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. मात्र, अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा