मुंबई

अदाणी इलेक्ट्रिसिटी युटिलिटी रेटिंगमध्ये अव्वल; सलग दुसऱ्या वर्षी स्थान कायम

देशभरातील ६६ वीज वितरण कंपन्यांच्या मूल्यमापनात अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (अदाणी इलेक्ट्रिसिटी), जी अदाणी ग्रुप चा भाग आहे, हिने सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोच्च क्रमांकाची वितरण युटिलिटी म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. ९२.५ गुणांसह कंपनीने महत्त्वाच्या निकषांवर सातत्यपूर्ण कामगिरी दर्शवली आहे.

Swapnil S

मुंबई : देशभरातील ६६ वीज वितरण कंपन्यांच्या मूल्यमापनात अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (अदाणी इलेक्ट्रिसिटी), जी अदाणी ग्रुप चा भाग आहे, हिने सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोच्च क्रमांकाची वितरण युटिलिटी म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. ९२.५ गुणांसह कंपनीने महत्त्वाच्या निकषांवर सातत्यपूर्ण कामगिरी दर्शवली आहे.

मुंबईत ३० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणारी ही युटिलिटी विश्वसनीयता, तत्परता आणि पारदर्शकता यांना आपल्या कामाच्या केंद्रस्थानी ठेवते. अदाणी इलेक्ट्रिसिटीला ए प्लस रेटिंग मिळाले असून यामागे पुरवठ्याची विश्वसनीयता, बिलिंगमधील अचूकता आणि प्रभावी तक्रार निवारण यांचा मोठा वाटा आहे.

यावरून स्पष्ट होते की ग्राहक परिणामांमध्ये अंमलबजावणी महत्त्वाची भूमिका बजावते. संपूर्ण क्षेत्रात ग्राहक सेवा निर्देशांक सुधारले असून, सहा कंपन्यांना ए प्लस रेटिंग मिळाले आहे, तर कोणतीही कंपनी सर्वात खालच्या श्रेणीत आलेली नाही. दरम्यान, ही केवळ कामगिरीची मोजमाप नसून आम्ही सेवा देत असलेल्या शहराने ठेवलेल्या आमच्यावर विश्वासाचेही ते द्योतक आहे. यामुळे मुंबईतील आमची सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी विश्वसनीय, कार्यक्षम आणि सक्षम वीज पुरवठा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळते, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल यांनी सांगितले.

Mumbai Local Update : उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Surat Fire : सुरतमधील कापडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे प्रचंड लोट, घटनेचा Video समोर

Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?