मुंबई

मुंबईकरांच्या चिंतेत भर,रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम तीव्र

मुंबईत चौथ्या लाटेचा फैलाव झपाट्याने होत असून रोज आढळणारी रुग्ण संख्या चिंतेत भर टाकणारी आहे

प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फैलाव झपाट्याने होत आहे. चौथी लाट रोखण्यासाठी अतिजोखीम रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम तीव्र केली आहे. रोज आढळणाऱ्या अतिजोखीम रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. दररोज १० ते १२ हजार व्यक्तींना ट्रेस केले जात असून क्लोज काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत चौथ्या लाटेचा फैलाव झपाट्याने होत असून रोज आढळणारी रुग्ण संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. विशेषत: गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. चौथ्या लाटेत बाधित होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध मोहीम तीव्र केली आहे. एका बाधित रुग्णांच्या मागे ८ ते १० संशयीतांचा शोध घेतला जात आहे. सोमवारी ८, ८६५ संशयीतांचा शोध घेतला असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. तसेच रोज आढळणाऱ्या अतिजोखीम रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना काळजी केंद्रांत उपचारासाठी दाखल करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम