मुंबई

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर, बीए ४,५ व्हेरिएंटचा धोका वाढला

बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चा १ तर बी ए.५ चे १८ रुग्ण आढळले आहेत.

प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनाचा नवीन व्हेरिएंट बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत आहे. रविवारी पुण्यात बीए ४ चे १९ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १७ रुग्ण आढळल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या १३२ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ५७ वर पोहोचली आहे. बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चा १ तर बी ए.५ चे १८ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बी ए. २.७५ व्हेरियंटचे देखील १७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत. या नमुन्यांची तपासणी इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले