मुंबई

गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! २ वर्षांसाठी सनद रद्द; कारवाईमागे कारण काय?

महाराष्ट्र बार कौन्सिलने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद २ वर्षांकरता निलंबित केली

प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली आहे. त्यांनी वकिली आचारसंहितेचे उल्लंघन करुन वकिली गणवेशामध्ये आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते आता २ वर्षांसाठी कोणत्याही न्यायालयात वकिली करु शकणार नाहीत किंवा कोणाचीही बाजू मांडू शकणार नाही.

वकिलांच्या गणवेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचा ठपका अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात २ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आंदोलनावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या निर्णयाला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले