मुंबई

विमान कोसळताना झाडावर धडकले व नंतर पडले; अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल महिन्याभराने जाहीर

अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना झालाय पूर्ण झाला आहे. अजितदादांच्या विमानाचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी असतानाही लँडिंग करण्यात आले असे या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल शनिवारी अखेर जाहीर आला आहे. डीजीसीएने आपल्या वेबसाईटवर अहवाल प्रसिद्ध केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना झालाय पूर्ण झाला आहे. अजितदादांच्या विमानाचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी असतानाही लँडिंग करण्यात आले असे या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. तसेच विमान कोसळताना आधी झाडावर धडकल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. तसेच बारामतीचे विमानतळ हे अनियंत्रित विमानतळ असून त्या ठिकाणी महत्त्वाच्या सुविधांचा अभाव असल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी विमान प्रथम झाडांना धडकले आणि नंतर जमिनीवर आदळल्याचे या अहवालात म्हटल आहे. तसेच लँडिंगवेळी 'ओह शीट, ओह शीट' हे शब्द ऐकू आल्याचंही या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेतून टीम येणार भारतात

अपघातावेळी २ हजार मीटर इतरी दृष्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकेन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे., कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि 'एफडीआर' डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. हा रिपोर्ट अपघाताच्या कारणांची प्राथमिक माहिती देणारा आहे. मात्र उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सदर अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अंतिम निष्कर्षांसाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विमानासंबंधी माहिती

  • विमानाची नोंदणी, एअरवर्थिनेस प्रमाणपत्र वैध आहे.

  • शेवटचे इन्स्पेक्शन मार्च २०२५ मध्ये झाले.

  • इंजिन तपासणी वैध.

  • 'एमईएल 'अंतर्गत कोणतीही प्रलंबित बाब नव्हती.

  • वजन आणि इंधन मर्यादा नियमांनुसार.

प्राथमिक अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर पायलटने गो-अराऊंड केले.

  • दुसऱ्या प्रयत्नावेळी रनवे ११ वर लैंडिंग क्लीअरन्स मिळाले.

  • अपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या अनियंत्रित विमानतळावर लैंडिंग झाले.

  • दृश्यमानता किमान मर्यादेपेक्षा कमी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला.

  • अंतिम क्षणी कॉकपिटमधून "ओह शीट, ओह शीट" असा आवाज आला.

  • विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळले.

  • विमान प्रथम झाडांना धडकले आणि नंतर ते जमिनीवर आदळले.

  • अपघातानंतर विमानाला आग लागली, कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळाले.

  • अपघाताच्या अंतिम कारणांचा तपास अद्याप सुरू.

बारामती विमानतळातील सुरक्षा त्रुटी

  • रन वेवरील मार्किंग सहज दिसू शकतील असे नाहीत.

  • रन वेवर बारीक खडी आढळली.

  • रन वेला परिपूर्ण कुंपण नाही.

  • विमानतळावर अग्निशमन सुविधा नाही.

  • फक्त व्हीएफआर ऑपरेशन्सला परवानगी.

  • अनकंट्रोल्ड एअरफिल्ड आहे, नियमित एयीसी सुविधा नाही.

  • ब्लॅक बॉक्स, 'एफडीआर' डेटा यशस्वीरित्या डाऊनलोड.

  • 'सीव्हीआर' थर्मल डॅमेज; डेटा पुनर्प्राप्तीसाठी अमेरिकेची मदत.

  • तपास अद्याप सुरू.

इस्रायल-इराण युद्ध भडकले; इराणचे पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले

मुंबईतील ७०० चौरस फूट मालमत्तांना करमाफी; पालिका सभागृहाने दिली मंजुरी; प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर

IND vs WI, ICC T20 WC26 : भारतासाठी 'करो या मरो'! विंडीजविरुद्धच्या विजयानंतर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार

मार्च महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत