एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
मुंबई

सर्व धारावीकरांना पुनर्विकास प्रकल्पातच घरे मिळतील! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुनर्विकासाच्या काळात त्यांना संक्रमण शिबिरात अथवा भाड्याच्या घरात जावे लागणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : सर्व धारावीकरांना पुनर्विकास प्रकल्पातच घरे मिळतील. धारवीकर थेट आपल्या नवीन घरता प्रवेश करतील. पुनर्विकासाच्या काळात त्यांना संक्रमण शिबिरात अथवा भाड्याच्या घरात जावे लागणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एका मुलाखतीत शिंदे म्हणाले की, धारावीचा पुनर्विकास आमच्यासाठी आव्हान होते. त्याचबरोबर कायमस्वरूपी धारावी बदलण्याची संधीही होती. धारावीचे पुननिर्माण जागतिक स्तरावर नवा मापदंड तयार करेल, अशी मला खात्री आणि विश्वास आहे. गुंतवणूक व उत्पन्नाचेनवे स्रोत निर्माण होतील, असा विश्वास मला वाटतो. तेव्हा या नव्या विकासासाठी आपण तयार व्हा.

मुख्यमंत्ऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात मुंबईत बराच बदल झाला आहे. तसेच या महानगरात काही भाग अजूनही मागासपणाची व गरिबीची बेटे घेऊन जगत आहेत. मुंबईच्या विकासात या बाबी नेहमीच अडचणीच्या ठरतात. त्यासाठी आपल्याला विकासाकरिता बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी