'डाऊन टू अर्थ' छायाचित्रांचे शानदार प्रदर्शन  छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

स्वतंत्र पत्रकार हे लोकशाहीचा कणा! ॲमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हॅल्सेमा यांचे प्रतिपादन; 'डाऊन टू अर्थ' छायाचित्रांचे शानदार प्रदर्शन

जगभरात हुकूमशाही वाढत असून लोकशाही तीव्र दबावाखाली असलेल्या काळात आपण स्वतंत्र पत्रकार, वार्ताहर आणि छायाचित्रकारांचे खंबीरपणे संरक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ॲमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हॅल्सेमा यांनी केले.

प्रतिनिधी

चिरंतना भट/मुंबई

जगभरात हुकूमशाही वाढत असून लोकशाही तीव्र दबावाखाली असलेल्या काळात आपण स्वतंत्र पत्रकार, वार्ताहर आणि छायाचित्रकारांचे खंबीरपणे संरक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ॲमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हॅल्सेमा यांनी केले. स्वतंत्र पत्रकार कोणत्याही ठिकाणी काम करत असले तरी सुस्थितीतील लोकशाहीचा ते कणा आहेत, असे त्यांनी नमूद केले.

स्वतंत्र पत्रकार आणि छायाचित्रकारांचे संरक्षण करण्याची गरज ॲमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हॅल्सेमा यांनी शुक्रवारी व्यक्त केली. नरिमन पॉइंट येथील ‘गॅलरी एफपीएच’ येथे ‘वर्ल्ड प्रेस फोटो’च्या ‘डाऊन टू अर्थ : क्लायमेट चेंज अँड क्लायमेट फ्युचर्स’ या प्रदर्शनाचे त्यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनाच्या भारतातील पहिल्या आयोजनावेळी बोलताना दुर्लक्षित कथा लोकांसमोर आणण्याची आणि जगभरातील लोक सामायिक संकटावर कसा प्रतिसाद देत आहेत हे दाखवण्याची क्षमता छायाचित्रांत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘द फ्री प्रेस जर्नल’चे अध्यक्ष अभिषेक कर्नानी उद्घाटनाला उपस्थित होते आणि त्यांनी प्रदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ॲमस्टरडॅम, मुंबई किंवा इतर कोणतेही शहर असो, आपण सर्वच हवामान संकटाचा सामना करत आहोत. कला दालनातील छायाचित्रांतून जागतिक तापमानवाढीचे गंभीर परिणाम तर दिसतातच, पण समुदायांमधील सर्जनशीलता आणि त्यावर मात करण्याची क्षमताही दिसते.
फेम्के हॅल्सेमा, महापौर, ॲमस्टरडॅम
स्वतंत्र पत्रकार हे लोकशाहीचा कणा! ॲमस्टरडॅमच्या महापौर फेम्के हॅल्सेमा यांचे प्रतिपादन

छायाचित्रे प्रेरणा देतील

वांशिक छळाचा सामना करत ताठ मानेने शाळेत जाणारी डॉरोथी काऊंट्स, चीनमध्ये रणगाड्यांसमोर उभा असलेला व्यक्ती व नॅपाम हल्ल्यातून पळणारी व्हिएतनामी मुलगी या छायाचित्रांची त्यांनी आठवण करून दिली. प्रदर्शनातील छायाचित्रे हवामान संकटावर उपाय शोधण्यासाठी प्रेरणा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय भागीदारी

सामायिक मूल्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय भागीदारी आवश्यक अशी लवचिकता टिकण्यासाठी लोकांना विचार करण्याची, निर्मिती करण्याची, कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि समस्यांवर मोकळेपणाने बोलण्याची मुभा असणे आवश्यक असल्याचे हॅल्सेमा यांनी नमूद केले. मानवी हक्कांचा आदर आणि शाश्वत विकासाची बांधिलकी यांसारख्या सामायिक मूल्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय भागीदारी त्यांनी सुचवली.

आंतरराष्ट्रीय व्यवस्था उभारण्यास मदत

भू-राजकीय शक्तीच्या प्रदर्शनाला अशा सामायिक मूल्यांवर आधारित आंतरराष्ट्रीय भागीदारी हा समतोल साधणारा पर्याय ठरू शकेल, असे हॅल्सेमा म्हणाल्या. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अशा युतीमुळे मानवी हक्क, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारी तसेच शाश्वत विकासाला पाठबळ देणारी आंतरराष्ट्रीय व्यवस्था उभारण्यास मदत होऊ शकते.

छायाचित्रांत अद्भुत क्षमता

या आधी नेदरलँड्सच्या वाणिज्यदूत नबिल ताओती यांनी या प्रदर्शनामुळे ॲमस्टरडॅम व मुंबई एका सामायिक चिंतेभोवती एकत्र आल्याचे सांगितले. घाईत असतानाही थांबायला लावण्याची अद्भुत क्षमता छायाचित्रांत असते. जगाच्या इतर भागांतील छायाचित्रांमुळे दूरवर राहणाऱ्या लोकांशी आपले किती साम्य आहे याची जाणीव दर्शकांना होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक युती उभारावी!

हवामान बदलाविरोधात सामूहिक प्रतिसाद देण्याबरोबरच जागतिक युती उभारण्याचे आवाहन मुंबई प्रेस क्लबचे चेअरमन एस. बालकृष्णन यांनी केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा