Twitter
मुंबई

कोटयवधी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीप्रकरणी आणखी एक अटक

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने अंबरनाथ येथून केमिकल कंपनीच्या मालकाला अटक केली.

वृत्तसंस्था

2500 कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने अंबरनाथ येथून केमिकल कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. अमली पदार्थ बनवण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अंबरनाथच्या नमाऊ केमिकल फॅक्टरीच्या मालकाला अटक केली.

कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थ उत्पादन प्रकरणात ही आठवी अटक आहे. मुख्य आरोपी प्रेमशंकर सिंग हा अंबरनाथच्या नमाऊ केमिकल फॅक्टरीतच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार करायचा. त्या बदल्यात कंपनीच्या मालकाला प्रति किलो कमिशन मिळत होते. गेल्या महिन्यातच अँटी नार्कोटिक्स सेलने या कंपनीवर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे ड्रग जप्त केले होते.

जिनेंद्र बोरा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी याच कंपनीचे व्यवस्थापक किरण पवार यालाही अंमली पदार्थ विरोधात अटक केली आहे.

महिनाभरापूर्वी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अंबरनाथच्या खासगी नमाऊ केम कंपनीवर शोधमोहीम राबवून नालासोपारा येथे 1400 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. कंपनी फार्मास्युटिकल उत्पादनासाठी 14 प्रकारच्या कच्च्या मालाची निर्मिती करते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करते. एमडी ड्रग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एकाच केमिकल कंपनीतून पुरवले जात असल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा