मुंबई

हसन मुश्रिफांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रिफांवर करण्यात आला होता.

मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने जामीन अर्जाच्या निकालापर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते, मात्र आता ते संरक्षण संपले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, नलावडे साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक व्यावसायिकांवर ईडीने छापेमारी केली होती.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!