मुंबई

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा देखावा; आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाची पर्यावरणपूरक कागदी गणेशमूर्ती

पारशीवाडी मित्र मंडळ अर्थात आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढा हा देखावा साकारला आहे. मराठी भाषा व मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणे या विषयाला अनुसरून देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून गणेशाची मूर्ती बनवली आहे.

Swapnil S

मुंबई: पारशीवाडी मित्र मंडळ अर्थात आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढा हा देखावा साकारला आहे. मराठी भाषा व मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणे या विषयाला अनुसरून देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून गणेशाची मूर्ती बनवली आहे.

आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच देखाव्याच्या माध्यमातून विविध विषयांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत असते. या वर्षी संयुक्त महाराष्ट्र या विषयावर देखावा साकारण्यात आला आहे. यंदाचा देखावा कला दिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी साकरला असून पराग पारधी यांनी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती साकारली आहे.

आदिवासी पाड्यांना मदतीचा हात

मंडळांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात आदिवासी पाड्यात राहणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते, अशी माहिती आर्थर रोडचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस अतुल देसाई यांनी दिली.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता