Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
मुंबई

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

प्राथमिक तपासात संबंधित दुचाकीची पुढील नंबर प्लेट तुटलेली असल्याचे, तर मागील नोंदणी क्रमांकाची प्लेट...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : दुचाकींना प्रवेशबंदी असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) वर एका अज्ञात रायडरने चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत वाहतूक नियमांचा भंग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवडी पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित दुचाकीस्वाराचा शोध सुरू केला आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित दुचाकीस्वाराने मागे एक प्रवासी बसवून अटल सेतूवर भरधाव वेगाने प्रवास केल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधत घटनेचा तपास सुरू केला.

नंबर प्लेट लपवल्याचा संशय

प्राथमिक तपासात संबंधित दुचाकीची पुढील नंबर प्लेट तुटलेली असल्याचे, तर मागील नोंदणी क्रमांकाची प्लेट जाणीवपूर्वक झाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ओळख लपविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोणताही पुरावा नाही

पोलिसांनी नवी मुंबईच्या दिशेने असलेल्या टोल नाक्यावरील नोंदींची तपासणी केली. मात्र, संबंधित दुचाकी अटल सेतू ओलांडून बाहेर गेल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे दुचाकीस्वार मुंबईच्या बाजूनेच परत फिरला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

दुचाकीस्वाराने अटल सेतूवर प्रवेश नेमका कुठून केला आणि बाहेर पडण्यासाठी कोणता मार्ग वापरला, याचा शोध घेण्यासाठी अटल सेतू तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. संबंधित रायडरची ओळख पटवून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी

Ganeshotsav 2026 : मोदकापासून पुरणपोळीपर्यंत; जाणून घ्या बाप्पाच्या नैवेद्यातील खास पदार्थ

बाप्पाच्या स्वागताला ज्ञानदा रामतीर्थकरचा मराठमोळा अंदाज; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

श्रिया पिळगावकरचा रंगीबेरंगी अंदाज; 'मिर्झापूर'च्या स्वीटीचा ग्लॅमरस लूक व्हायरल

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video