Mumbai : सरकते जिने, १४ CCTV कॅमेऱ्यांची नजर; वांद्रे येथील स्कॉयवॉक पादचाऱ्यांच्या सेवेत Photo : X (Zoru Bhathena)
मुंबई

Mumbai : सरकते जिने, १४ CCTV कॅमेऱ्यांची नजर; वांद्रे येथील स्कॉयवॉक पादचाऱ्यांच्या सेवेत

वांद्रे रेल्वे स्‍थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शनपर्यंतची नवीन आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची आहे. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने आहेत. दोन सरकते जिने, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : वांद्रे रेल्वे स्‍थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शनपर्यंतची नवीन आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची आहे. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने आहेत. दोन सरकते जिने, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वांद्रे येथील स्कॉयवॉक पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल झाला आहे.

वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुल, म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्मित नवीन आकाश मार्गिकेचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिकेमार्फत ही उच्च प्रतीची, दीर्घकाळ टिकणारी व आधुनिक सुविधांनी युक्त आकाश मार्गिका उभारण्यात आली आहे.

या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम तसेच एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे आदी उपस्थित होते. आकाश मार्गिकेचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहाय्यक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्मचारी, प्रवाशांचा वेळ वाचणार

वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते म्हाडा कार्यालय, पश्चिम पूर्व महामार्ग, वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुलच्या वाणिज्यिक परिसरातील कार्यालयांमधून मार्गक्रमण करणारे कर्मचारी, पादचाऱ्यांसाठी ही आकाश मार्गिका उपयुक्त ठरणार आहे. थेट रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे रस्ता ओलांडण्यासाठी उपलब्ध सुविधेमुळे पादचारी या आकाश मार्गिकेचा वापर करतील.

सुरक्षित व वेळेची बचत करणारी मार्गिका

वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व), वांद्रे न्यायालय, म्हाडा कार्यालय तसेच वांद्रे-कुर्ला संकुल या अत्यंत वर्दळीच्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने पादचाऱ्यांची ये-जा होत असते. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि काणेकर रस्त्यावरील गर्दीमुळे रस्ता ओलांडताना अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि वेळ बचत करणारी सुविधा म्हणून या आकाश मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे.

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त