बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला (संग्रहित फोटो)
मुंबई

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसेसना टोलमाफी द्यावी, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसेसना टोलमाफी द्यावी, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांना पथकरातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बेस्ट बसेसनाही पथकरातून वगळा, अशी मागणी केल्याचे तृष्णा विश्वाराव यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत तब्बल ७० कोटींचा टोल भरण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात, बेस्ट उपक्रमाकडून महापालिका हद्दीच्या पलीकडे ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या ठिकाणच्या ४० बसमार्गांवर ३८२ बसगाड्यांमार्फत २०४६ बसफेऱ्या करण्यात येतात. या बसगाड्यांना पथकर नाक्यावर बेस्ट उपक्रमातर्फे पथकर प्रदान करण्यात येतो. बेस्ट ही सार्वजनिक सेवा देणारी संस्था असून ‘ना नफा, ना तोटा’ आधारित बससेवा देते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसगाडयांना वागळण्यात आलेल्या पथकर सवलतीच्या धर्तीवर बेस्ट उपक्रमांच्या गाड्यांना देखील पथकरातून वगळा, अशी मागणी केली आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन