अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या शून्य ते चार किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक बसविले आहेत.  
मुंबई

अटल सेतूवर बेस्ट बसेसही धावणार; बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान प्रवासी सेवेत

मुंबई ट्रान्स हार्बर अटल सेतू पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ जानेवारीला झाले.

Swapnil S

मुंबई : न्हावाशेवा अर्थात अटल सेतू २१ जानेवारीपासून प्रवासी सेवेत आला. आता अटल सेतूवरून बेस्ट बसेसही धावणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार असून प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता बसेसची संख्या वाढवण्यात येईल. बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान प्रवासी सेवेत धावणार आहे. दरम्यान, अटल सेतूवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बसेसचे तिकीट अद्याप निश्चित केलेले नाही.

मुंबई ट्रान्स हार्बर अटल सेतू पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ जानेवारीला झाले. २१.८ किलोमीटर लांब अटल सेतू असून या सेतूवर बेसस धावणार ही पहिली सार्वजनिक परिवहन सेवा देणारी असणार आहे. अटल सेतू २१.८ किमी लांब असून १६.५ किमी मार्ग समुद्रावर आहे. अटल सेतू बनवण्यासाठी तब्बल १७,८४० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अटल सेतूवर बस नंबर एस -१४५ चलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बस मार्ग १४५ कोकण भवन, बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणार आहे.

BMC Elections Results 2026 : लढाई संपलेली नाही! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

BMC Elections : शिंदे सेनेचा सावध पवित्रा; नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये; अडीच वर्षे महापौरपदासाठी शिंदेचे दबावतंत्र

आजचे राशिभविष्य, १८ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज