Mumbai : १० व्या मजल्यावरून पडूनही तरुणी बचावली; भांडुप पश्चिम येथील घटना, VIDEO व्हायरल व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
मुंबई

Mumbai : १० व्या मजल्यावरून पडूनही तरुणी बचावली; भांडुप पश्चिम येथील घटना, VIDEO

भांडुप पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या २६ वर्षीय तरुणीचा अग्निशमन दलाने थरारक बचाव केला. उडी मारल्यानंतर ती इमारतीलगतच्या ...

Swapnil S

मुंबई : भांडुप पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या २६ वर्षीय तरुणीचा अग्निशमन दलाने थरारक बचाव केला. उडी मारल्यानंतर ती इमारतीलगतच्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

जखमी अवस्थेतील तरुणीला उपचारासाठी प्रथम अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भांडुप पश्चिम तुळशेतपाडा परिसरातील लेक रोडवर सनशाईन इमारत आहे. संबंधित तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली. मात्र खाली कोसळण्याऐवजी ती इमारतीलगत असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये सुमारे २० ते २५ फूट उंचीवर अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने पहिल्या मजल्यावरून हुक लॅडरच्या सहाय्याने बचावकार्य राबवत तरुणीला सुरक्षित खाली उतरविले. त्यानंतर तिला खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय