Admin
मुंबई

नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील अन्य काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे वृत्त

वृत्तसंस्था

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राणे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. नारायण राणे यांच्या राज ठाकरेंच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही नेते नेमक्या कोणत्या कारणासाठी भेटले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील अन्य काही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे वृत्त आहे. या भेटीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. या दरम्यान राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती, मात्र राणे त्यावेळी घरी नव्हते. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. नारायण राणे यांनी आपल्या पत्नीसह ही भेट घेतल्याची माहिती आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत